२१ व्या सुरज अंडर १६ स्पर्धेत जांभळीचा अभय भोसले विजेता
नूतन बुध्दिबळ मंडळ, सांगली व सूरज स्पोर्टस अकॅडेमी, कुपवाड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आणि कच्छी जैन भवन, राममंदिर , सांगली याठिकाणी झालेल्या सूरज रॅपिड् १६ वर्षाखालील बुध्दिबळ स्पर्धेत विक्रमी ५४५ खेळाडूचा सहभाग नोंदवला गेला. सांगलीच्या ईश्वरी जगदाळे व जांभळीचा अभय भोसले यांच्यातील डावात दोघांनी कोणताही धोका न पत्करता डाव बरोबरीत सोडविला बुकोल्झ गुणाच्या आधारे अभयने ७.५ गुणासह रू. १५०५०/- च्या रोख पारितोषिकासह सूरज चषक पटकाविला तर ईश्वरीने ७.५ गुणासह रू. १२५००/- च्या रोख पारितोषिकासह उपविजेतेपद पटकाविले. फोटो सौजन्य : नूतन बुद्धिबळ मंडळ
स्पर्धेचे दिमाखात उद्घाटन :
या स्पर्धेचे पटावरील चाल खेळून, दिप प्रज्वलन करून निवृत्त सनदी अधिकारी मा. पी.डी. करंदीकर यांच्याहस्ते व सूरज सूरज स्पोर्टस अकॅडेमीचे संस्थापक मा. प्रवीणशेठ लुकंड , कर्नल दिवाणजी यांच्याहस्ते करण्यात आले. महाराष्ट्र चेस असो. चे उपाध्यक्ष मा. गिरीश चितळे , उपाध्यक्ष प्रमोद चौगुले , प्रा. रमेश चराटे , चिंतामणी लिमये ,स्मिता केळकर, विनायक जोशी , प्रा. संगिता पागनीस प्रा. माधुरी कात्रे, सीमा कठमाळे , विजयकुमार माने यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
मा. पी.डी. करंदीकर यांचा सत्कार प्रमोद चौगुले यांच्याहस्ते, प्रविणशेठ लुकंड व कर्नल दिवाणजी यांचा चिंतामणी लिमये यांच्याहस्ते तर प्रा. संगिता पागनीस यांचा स्मिता केळकर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. स्वागत व प्रास्ताविक उल्हास माळी यांनी तर पाहुण्यांचा परिचय प्रमोद चौगुले यांनी करून दिले. आभार विजयकुमार माने यांनी मानले. यावेळी राष्ट्रीय बुध्दिबळ स्पर्धेत उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल ईश्वरी जगदाळे, विक्रमादित्य चव्हाण यांचा तर स्विमींगमध्ये रिशी भगत व ऋचा भगत , धावपटू साईश्वर गुटूंक यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या स्पर्धेला महाराष्ट्रातील सांगली, सातारा, सोलापूर , कोल्हापूर, पुणे, सिंधुदुर्ग, आदि जिल्हयांतील तर कर्नाटक, गोवा आदि राज्यातील ५४७ खेळाडू सहभागी झाले होते यामध्ये ७५ आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडू सहभागी झाले होते. यामध्ये इचलकरंजीचा विवान सोनी, सांगलीचा विक्रमादित्य चव्हाण, राष्ट्रीय खेळाडू ईश्वरी जगदाळे, जयसिंगपूरचा अभय भोसले, सांगली आदित्य चव्हाण, आष्टयाचा पार्श्व लिगाडे, सुश्रुत नानल, सांगलीचा अरीन कुलकर्णी , मृण्मयी गोसावी, रिहान गोयल, हर्ष धनवडे, सिध्दी कर्वे , सारा हरोले, अर्णव शेडगे, हित बलदवा, मिहीर पिंपरकर, स्वरूप साळवे, अरीना मोदी, अर्ण पोर्लेकर यांच्यासह अनेक नामांकित खेळाडूंचा समावेश होता.
स्पर्धेच्या आठव्या फेरीत सांगलीची ईश्वरी जगदाळे व जांभळीचा अभय भोसले यांच्यातील डावात दोघांनी कोणताही धोका न पत्करता डाव बरोबरीत सोडविला बुकलोझ गुणाच्या आधारे अभयने ७.५ गुणासह रू. १५०५०/- च्या रोख पारितोषिकासह सूरज चषक पटकाविला तर ईश्वरीने ७.५ गुणासह रू. १२५००/- च्या रोख पारितोषिकासह उपविजेतेपद पटकाविले.
सांगलीचा आदित्य चव्हाण व महाराष्ट्राचा श्रेयस कुदळे यांच्यातील डावात आदित्यने श्रेयसचा पराभव करून ७.५ गुणासह रू. १०,०००/- च्या रोख पारितोषिकासह तिसरे स्थान पटकाविले तर श्रेयसला ६.५ गुणासह रू. ९००/- च्या रोख पारितोषिकासह पंधराव्या स्थानावर जावे लागले.
इचलकरंजीचा विवान सोनी व जयसिंगपूरचा वेदांन्त बांगड यांच्यातील डावात विवानने वेदांन्तचा पराभव करून ७ गुणासह रू. ८५००/- च्या रोख पारितोषिकासह चौथे स्थान पटकाविले तर वेदांन्तला ६ गुणासह चोवीसव्या स्थानावर जावे लागले. साईराज घोडके व विक्रमादित्य चव्हाण यांच्यातील डावात साईराजचा विक्रमादित्यने पराभव करून ७ गुणासह रू. ६०००/- च्या रोख पारितोषिकासह सहावे स्थान पटकाविले तर साईराजला ६ गुणासह चौतीसव्या स्थानावर जावे लागले.आदित्य महादेव कोळी व स्वरूप साळवी यांच्यातील डावात स्वरूपने आदित्यचा पराभव करून ७ गुणासह रू. ७०००/- च्या रोख पारितोषिकासह पाचवे स्थान पटकाविले.
स्पर्धेचा विस्तृत निकाल व बक्षिसे खालीलप्रमाणे :
मुख्य बक्षिसे :
फायनल रँक | खेळाडूचे नाव | गुण | फायनल रँक | खेळाडूचे नाव | गुण | |
१ | अभय भोसले ( जांभळी ) | ७.५ | २ | ईश्वरी जगदाळे ( सांगली ) | ७.५ | |
३ | आदित्य चव्हाण ( सांगली ) | ७.५ | ४ | विवान सोनी ( इचलकरंजी | ७ | |
५ | स्वरूप साळवी ( महाराष्ट्र ) | ७ | ६ | विक्रमादित्य चव्हाण ( सांगली | ७ | |
७ | सोहम लांगोरे ( महाराष्ट्र ) | ७ | ८ | प्रेम निचल ( महाराष्ट्र ) | ७ | |
९ | कश्यप खाकंरीया ( सांगली | ७ | १० | अर्णव शेडगे ( सांगली ) | ७ | |
११ | हित बलदवा ( जयसिंगपूर ) | ७ | १२ | रियान गोयल ( महाऱाष्ट्र ) | ६.५ | |
१३ | सर्वेश दामले ( महाराष्ट्र ) | ६.५ | १४ | तन्मयी घाटे ( महाऱाष्ट्र ) | ६.५ | |
१५ | श्रेयस कुदळे ( महाऱाष्ट्र ) | ६.५ | १६ | विहान कोनगिरी ( महाऱाष्ट्र ) | ६.५ | |
१७ | वरद तवटे ( महाऱाष्ट्र ) | ६.५ | १८ | ऋचित मुके ( सांगली ) | ६.५ | |
१९ | ) मृण्मयी गोसावी ( सांगली ) | ६.५ | २० | अथर्व तावरे ( महाऱाष्ट्र ) | ६.५ | |
२१ | अरेणव पोर्लेकर ( महाऱाष्ट्र ) | ६.५ | २२ | राघव भंडारगे ( महाऱाष्ट्र ) | ६.५ | |
२३ | अव्दिक फडके ( सांगली | ६ | २४ | वेदांत बागंड ( महाऱाष्ट्र ) | ६ | |
२५ | अर्णव भस्मे ( सांगली ) | ६ | २६ | अरीन कुलकर्णी ( महाऱाष्ट्र ) | ६ | |
२७ | वैभव राऊल ( महाऱाष्ट्र ) | ६ | २८ | संस्कृती सुतार ( महाऱाष्ट्र ) | ६ | |
२९ | सोहम देशमुख ( महाऱाष्ट्र ) | ६ | ३० | रितेश मुंचडीकर ( महाऱाष्ट्र ) | ६ | |
३१ | आशिष मोटे ( सांगली) | ६ |
उत्तेजनार्थ बक्षिसे :
उत्कृष्ठ महिला खेळाडू – जिया शेख,सिध्दी कर्वे,सृष्टी जोशीराव, सृष्टी चिंचणे,सिध्दी बुबणे, संधूपत्ला श्रेया,श्रीनिधी भोसले,पृथा ठोंबरे,अनुजा कोळी, स्नेहल गावडे
उ्त्कृष्ठ इतर राज्यातील खेळाडू - दिव्यांश तालीमनी, एस.एम. परिक्षित,विश्रान कुमारन, श्रेयस आंबवडेकर,सिध्दांत पाटील, अन्वय बोरकर,ओम संकपाळ,तन्मयी पावले, पी. अक्षय, बाळासाहेब चाकोले
उ्त्कृष्ठ महाराष्ट्र राज्यातील खेळाडू ( सांगली सोडून ) - आर्यन थोरात, कृष्णा सारडा, अर्यन पाटील,विरेन बुजरे, तनिष तेंडूलकर,हर्षित सोमाणी, आदित्य राठोड, आराध्या ठाकूरदेसाई, वेदांत मुसळे, श्रेयांस रणदिवे, सर्वेश पोतदार, अथर्व सुतार, हर्ष राऊल,शशांक जमादार
उत्कृष्ठ सांगली खेळाडू – अथर्व आलदार, पार्श्व लिगाडे,वेदांत कोरे, चिन्मय गुरव, प्रतिक झारे, वरद पाटील, ईसापुरे सुब्रम्हण्यम, आरूष सरनोबत, समर्थ हिप्परगी, समर्थ चिंधे, समृध्दा नाईक
उत्कृष्ठ ६ वर्षाखालील खेळाडू - श्रुत कन्नुरे, शिरीष होनकट्टी, आरव पाटील, झुआन शेख,वृषान शहा, चिन्मय पवार,शिवम कोकितकर, तन्मय मोहिते, ईरा मेणकर, अनुराग पानाडे, स्वराज धामणेकर,शार्वी कानिटकर, शिवन्य पाटील, आयनंश बाकीन, आव्दिका काडगे
उत्कृष्ठ ८ वर्षाखालील खेळाडू – वीर पाटील, नियान कांडकाठला,अमिरा बोरकर,विघ्नेश आंबपुरकर अव्दिक ठोंबरे,अनिरूध्द साळुंखे, ईशान माईणकर, आरव पाटील, रियांश कोतवाल,आगर्श धमन्नणावर, रंगराज नमन, आयुष लोंढे, केदार जोशी, केशव कौशिक, रिधान आत्तार
उत्कृष्ठ १० वर्षाखालील खेळाडू – शौर्य नांगरे, ओम नदांल, आदित्य कोकरे, सृजन टाकळे, संस्कृती पवार,वलय कांबळे,संकेत गडदे,विवान अस्पतवार,ऋग्वेद कुंभार, श्लोक चौधरी,अव्दिक कांबळे
उत्कृष्ठ १२ वर्षाखालील खेळाडू - अवनित नांदणीकर, अभास पाटील, माधवी, देशपांडे, तन्मय जोशी,बी. कोठला, निधी पोटे, आदित्य ठाकूर,अव्दितराज मिरजे, प्रणव शिंदे, स्वरा जाधव
उत्कृष्ठ १४ वर्षाखालील खेळाडू – सौमित्र केळकर, मिहीर पिंपरकर, दर्शन देसाई, तेजस खवाट, सुजल शिकलगार,वेदांन्त पुजारी, नंदिनी सारडा, वैभवी मुळीक, रूद्र माने, स्नेहा उप्पीनपाटील
उत्कृष्ठ स्कूल- नवकृष्णा व्हँली कुपवाड, सँन्थाम स्कूल,मातोश्री तानुबाई खाडे स्कूल, नवकृष्णा व्हँली उत्तूर,पोदार स्कूल, सांगली, केपीएसपी स्कूल,अभिनव बालकमंदिर,आप्पासाहेब बिरनाळे स्कूल, मातोश्री खाडे स्कूल, मिरज., एस.पी. खानापूर
उत्कृष्ठ अकॅडेमी – केपीएस चेस, केन चेस,मास्टर चेस,गोल्डन स्क्वेअर,प्रिमिअर चेस,मुक्ताई चेस,इचलकरंजी चेस, क्रिएटिव्ह चेस, चाणक्य चेस, ३२१ चेस अँकँडमी